झी मराठीवरील 'अग्गांबाई सुनबाई' मालिका खुपचं लोकप्रिय झाली आहे. यातील शुभ्रा आणि सुझैनचं युद्ध तर प्रेक्षकांना खुपचं आवडतं. मालिकेमध्ये सध्या वटपौर्णिमा साजरी केली जात आहे. त्यामुळे सासू आसावरी आणि सून शुभ्रा अगदी पारंपरिक वेशात तयार होऊन पूजा करत आहेत. शुभ्राच्या संसारात ढवळाढवळ करणारी सुझैनसुद्धा याठिकाणी आली आहे. आणि ती शुभ्राचा संसार मोडण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुझैनचं सत्य आसावरी समोर येणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सुझैन आणि बबड्या म्हणजेच सोहममध्ये असलेलं अफेयर अजूनही आसावरीला माहित नाही. आसावरीच्या नकळत हे सर्व सुरु आहे. सत्य आसावरी समोर आल्यावर सुझैन आणि बबड्याचं काय होईल हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.