दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना काही काळातचं नॅशनल क्रश ठरली आहे. आपल्या क्युटनेसनं रश्मिकानं अनेकांना वेड लावलं आहे. असचं एक उदाहरण नुकताच पाहायला मिळालं आहे. तेलंगणामध्ये राहणारा आकाश त्रिपाठी हा तरुण रश्मिकाचा खूप मोठा चाहता आहे. रश्मिकाला भेटण्यासाठी आकाशने चक्क गुगलचा आधार घेत तिच्या घराचा शोध सुरु केला. आणि तिला भेटण्यासाठी आकाशने तेलंगणामधून 900 किमीचं अंतर पार करत कर्नाटक गाठलं. विचारपूस करत तो अखेर कोडागू येथे जाणून पोहोचला. मात्र तेथील नागरिकांना आकाशवर संशय आला, त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी आकाशची चौकशी केली असता. हा सर्व प्रकार त्याने सांगितला. मात्र कोडागूमध्ये लॉकडाऊन असल्यानं पोलिसांनी आकाशला आपल्या घरी परत जाण्यास सांगितलं. तसेच रश्मिका शुटींगनिमित्त मुंबईत असल्याचंदेखील सांगितलं. म्हणून या चाहत्याला भेट न घेताच घरी परतावं लागलं.