अभिनेत्री एलिझाबेथ हर्ली ही ५६ वर्षीय असून तिचा फिटनेस हा तरुणींनाही लाजवणारा आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहेत. एलिझाबेथ ही इंग्लिश अभिनेत्री आणि मॉडेल आहे. नुकतच तिने एक न्युड फोटोशूट केलं आहे. एलिथाबेथने वयाच्या २९ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरूवात केली आहे. अभिनेत्रीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलं होतं. एलिझाबेथने भारतीय उद्योजक अरुण नायर याच्याशी विवाह केला होता. पण काही वर्षांनंतर २०११ साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एलिझाबेथ अभिनय , मॉडेलिंग शिवाय एक बिझनेसवनुमनही आहे. वयाच्या ५६ व्या वर्षीही तिने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे. एलिथाबेथ तिच्या वयाच्या ३० वर्षे लहान दिसत असल्याच्या कमेंट्सही तिला मिळतात. एलिझाबेथ ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिला तिच्या फोटोंवर फिटनेससाठी अनेक कमेंट्सही मिळत असतात.