

दाक्षिणात्य सुपरस्टार असणाऱ्या दुलकर सलमान ( (Dulquer Salmaan)चे देशभरातही लाखो चाहते आहेत. आज दुलकर 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा 28 जुलै 1986 रोजी जन्म झाला होता. सिनेमातील इंटिमेट सीन्सबाबत त्याने काही दिवसांपूर्वी एक खुलासा केला होता.


दुलकर एक रोमँटिंक आणि हटके हिरो म्हणून सिनेसृष्टीमध्ये प्रसिद्ध असला तरी खूप कमी लोकांना हे ठावूक आहे की, त्याला इंटिमेट सीन देणं कठीण जातं. इंटिमेट सीन करताना त्याला एक प्रकारती भीती वाटत असते.


सध्याच्या काळात सिनेमांमध्ये इंटिमेट सीन असणे ही खूप सामान्य बाब झाली आहे. मात्र अनेक कलाकारांनी मान्य केले आहे की त्यांना इंटिमेट सीन करणं कठीण होऊन जाते. यामध्ये दुलकरचे देखील नाव आहे. त्याने स्वत: ही बाब कबुल केली आहे (फोटो सौजन्य - इस्टाग्राम @dqsalmaan)


त्याने हे देखील मान्य केले आहे, कॅमेरासमोर त्याची ही अवस्था तो खूप चलाखीने लपवतो.(फोटो सौजन्य - इस्टाग्राम @dqsalmaan)


नेहा धूपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या चॅट शोमधील मुलाखतीमध्ये त्याने 'इंटिमेट सीन' बद्दलची ही भीती व्यक्त केली होती. त्याने यावेळी असे सांगितले होते की, अशा सीनच्या वेळी तो खूप बेचैन होतो आणि त्याचे हात देखील कापायला लागतात. तो असे म्हणाला की, 'मी नेहमी विचार करतो की माझी सहकलाकार काय विचार करत असेल की मी यातून बाहेर पडू इच्छित आहे? मग मला वाटतं की मी नेकेड आहे आणि ती माझ्या आतमध्ये जाऊन पाहू शकते की मी काय विचार करत आहे.' (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @dqsalmaan)


तो अशा सीनच्या वेळी चलाखी वापरतो. दुलकरने या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, 'मी अशावेळी शूटिंग करताना माझे हात अभिनेत्रीच्या केसांमागे लपवतो. खऱ्या आयुष्यात प्रेम व्यक्त करणं सोपं असते. कॅमेरासमोर शूट करणे कठीण असते'.


या मुलाखतीमध्ये त्याने सोनम कपूरबरोबर शूट केलेल्या इंटिमेट सीनबद्दलही भाष्य केले आहे. सोनम खूप गोड आहे, अशा शब्दात त्याने तिचं कौतुक केलं होतं.


सोनमबरोबर दुलकरने 'द झोया फॅक्टर' या सिनेमात काम केले आहे. यामध्ये त्याने क्रिकेटरची भूमिका निभावली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम @dqsalmaan)


दरम्यान त्याआधी दुलकरने 'कारवाँ' या हिंदी सिनेमामध्ये आपली छाप सोडली होती. यामध्ये त्याने मराठमोळी मिथिला पालकर आणि दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. यामध्ये तिघांचे बाँडिंग खूप खास आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @mithilapalkar)


सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारा दुलकर त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल नेहमीच चाहत्यांना अपडेट देत असतो. त्याच्या खास शैलीमुळे केवळ दक्षिणेतच नव्हे तर संपूर्ण भारतात त्याने त्याचा चाहते वर्ग कमावला आहे. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @dqsalmaan)