

केबीसी- १० या सिझनची पहिली कोट्याधीश झाल्या बिनीता जैन. बिनीता यांनी या १५ प्रश्नांची उत्तरं देऊन एक कोटी जिंकले. बिनीता यांनी योग्य पद्धतीने सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. स्वतः अमिताभ बच्चन हे बिनिता यांची हुशारी पाहून आवाक झाले. चला तर मग जैन यांना विचारण्यात आलेले ते १५ प्रश्न कोणते होते ते पाहू.


पहिल्या प्रश्नाचं उत्तर बिनीता यांनी सहजपणे दिलं. गरम मसाला या सिनेमात जॉन अब्राहमने काम केलं आहे.


सहाव्या प्रश्नात बिनीता यांना एक लोगो दाखवण्यात आला. हा लोगो काय आहे हे त्यांना ओळखायचं होतं. बरोबर उत्तर आहे- इंडिया पोस्ट


नऊव्या प्रश्नात बिनीता यांना ऑडिओ क्लिप ऐकवली गेली. यात कोणाचा आवाज आहे हे त्यांना ओळखायचे होते. या प्रश्नासाठी त्यांनी ऑडियन्स पोलची मदत घेतली. या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं जम्मू- कश्मीर


१२ व्या प्रश्नात बिनीता थोड्या अडचणीत सापडल्या. त्यामुळे त्यांनी ५०- ५० लाइफलाइनचा उपयोग केला. त्यानंतर त्यांनी द डिस्कवरी ऑफ इंडिया हे बरोबर उत्तर दिलं.


१४ व्या प्रश्नाचे उत्तर देताना बिनीता यांनी जोडीदार या लाइफलाइचा उपयोग करत वाराणसी हे उत्तर दिलं.


१५ व्या प्रश्नाचं उत्तर बिनीतांनी अतिशय विचारपूर्वक दिलं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केशवानंद भारती केस. योग्य उत्तर देऊन त्या १ कोटी रुपये जिंकल्या.