Anas Rashid: कुठे गायब आहे 'दिया और बाती हम' फेम सूरज राठी? अनसने का सोडली टीव्ही इंडस्ट्री?
Diya Aur Baati Hum Fame Anas Rashid: 'दीया और बाती हम'मध्ये 'सूरज जी'ची भूमिका साकारून टीव्ही अभिनेता अनस रशीद घरोघरी प्रसिद्ध झाला होता. ही मालिका टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात गाजलेल्या मालिकांपैकी एक
'दीया और बाती हम'मध्ये 'सूरज जी'ची भूमिका साकारून टीव्ही अभिनेता अनस रशीद घरोघरी प्रसिद्ध झाला होता. ही मालिका टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे.मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच अव्वल स्थान पटकावलं आहे.
2/ 8
मालिकेचा मुख्य अभिनेता अनस बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही मालिकेत दिसलेला नाही. कोणत्याही अवॉर्ड शो किंवा जाहिरातीतदेखीलदिसलेला नाहीय.अशा परिस्थितीत अनस कुठे गायब आहे? आणि तो सध्या काय करतोय? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. चला तर मग त्याच्याशी संबंधित काही अपडेट्स जाणून घेऊया.
3/ 8
'दिया और बाती हम'च्या सूरज अर्थातच अनसने आता टीव्ही जगताला रामराम ठोकला आहे. अभिनेता सध्या आपल्या खाजगी आयुष्यात व्यग्र आहे.
4/ 8
अनसचा जन्म पंजाबमधील मालेरकोटला येथे झाला होता. अभिनेत्याचं शालेय शिक्षण उर्दू मीडियम स्कूलमधून पूर्ण झालं आहे. त्यानंतर त्याने मानसशास्त्रातून पदवी घेतली आहे.
5/ 8
अनस अभिनेत्यासोबतच एक उत्तम गायकही आहे. परंतु सध्या तो या क्षेत्रापासून दूर आहे. अशात अभिनेत्याचा चुलत भाऊ मोहम्मद नाजीम मात्र अद्यापही मालिकांमध्ये काम करत आहे.
6/ 8
अनसने 2007 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 'कहीं तो होगा' ही त्याची पहिली मालिका होती. त्यानंतर त्याने 'क्या होगा निम्मो का?', 'ऐसे करो ना वादा', 'धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान' यासह अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
7/ 8
परंतु अभिनेत्याला सर्वात जास्त लोकप्रियता 'दिया और बाती हम'मधून मिळाली आहे. यामध्ये त्याने सुरज राठी ही व्यक्तिरेखा साकारली होती.
8/ 8
अनसने काही वर्षांपूर्वी आपल्यापेक्षा 14 वर्षांनी लहान मुलीसोबत लग्न करत संसार थाटला आहे. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत.