'या' कलाकारांसाठी यंदाची दिवाळी आहे खूपच खास; पालक म्हणून पहिल्यांदाच साजरा करणार दीपोत्सव
आज देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. देशभरातील लोक दिवाळी साजरी करण्यात व्यस्त आहेत. मनोरंजन विश्वातील तारेही दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. ज्याची देशभर चर्चा असते. मनोरंजन विश्वातील तारकांची दिवाळी नेहमीच चर्चेत असते. मग ते बॉलिवूड सेलिब्रिटी असो किंवा टीव्ही.दरम्यान ही दिवाळी काही टीव्ही सेलिब्रिटींसाठी खूप खास असणार आहे, कारण हे स्टार्स त्यांच्या छोट्या पाहुण्यांसोबत दिवाळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चारू असोपा-राजीव सेन- बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वहिनी आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा हिने 1 नोव्हेंबर रोजी पहिल्या अपत्याला जन्म दिला. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आता हे जोडपं त्यांच्या मुलीसोबत पहिली दिवाळी साजरी करणार आहे.
3/ 8
कपिल शर्मा-गिन्नी चतरथ- कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथने त्यांच्या दुसऱ्या मुलाला त्रिशानला जन्म दिला आहे. आपल्या मुलासह या दाम्पत्याची ही पहिलीच दिवाळी असेल.यापूर्वी त्यांना एक मुलगी आहे.
4/ 8
शाहीर शेख-रुचिका कपूर- टीव्ही अभिनेता शाहीर शेख आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' फेम रुचिका कपूर देखील पालक म्हणून त्यांची पहिली दिवाळी साजरी करत आहेत. सोबतच पती-पत्नी म्हणून त्यांची ही पहिलीच दिवाळी आहे.
5/ 8
मोहित मलिक-अदिती- 'कुल्फी कुमार बाजेवाला' फेम अभिनेता मोहित मलिक आणि आदिती या वर्षी एप्रिलमध्ये आई-वडील झाले होते. दोघांनी ही गोड बातमी सोशल मीडियावर जाहीर केली होती. म्हणजेच मोहित मलिक आणि आदितीसाठीही ही दिवाळी खूप खास असणार आहे.
6/ 8
नेहा धुपिया-अंगद बेदी- बॉलीवूड अभिनेत्री आणि रोडीज जज नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी अलीकडेच त्यांच्या दुसऱ्या मुलाचं कुटुंबात स्वागत केलं आहे. दुसऱ्या अपत्यासोबत ही त्यांची पहिली दिवाळी असेल.
7/ 8
अनिता हसनंदानी-रोहित रेड्डी- टीव्ही जगतातील सर्वात प्रसिद्ध जोडपे अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी त्यांच्या मुलासोबत पहिली दिवाळी साजरी करणार आहेत. अनिताने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुलगा आरवला जन्म दिला होता.
8/ 8
नकुल मेहता आणि जानकी- नकुल मेहता आणि जानकीही आई-वडील म्हणून पहिली दिवाळी साजरी करणार आहेत. जानकीने या वर्षी मुलाला जन्म दिला, जो आता 8 महिन्यांचा आहे.