मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमारच्या चित्रपटांची संख्या भलेही कमी असेल, पण फॅन फॉलोइंगच्या बाबतीत ती बड्या अभिनेत्रींच्या स्पर्धेत आहे. दिव्या खोसला कुमार नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. सध्या दिव्या तिचं लेटेस्ट गाणं 'डिझायनर सॉन्ग'मुळे चर्चेत आहे. गुरू रंधावा आणि यो यो हनी सिंगसोबत या गाण्यात दिव्या खोसला कुमारचा शानदार अवतार पाहायला मिळत आहे. पण, या सगळ्यामध्ये तिचे काही फोटोज आहेत, ज्यांना सर्वांकडून भलतीच पसंती मिळत आहे. (फोटो क्रेडिट्स : इन्स्टाग्राम: @divyakhoslakumar)