एका फ्लॉप सिनेमामुळं बदललं अभिनेत्रीचं आयुष्य अन् झाली कोट्यावधीची मालकीण
Divya Khosla Kumar Unheard Story: सगळ्यांना प्रश्न पडला असेल की, एक फ्लॉप सिनेमामुळं आयुष्य कसं काय चमकू शकते. मात्र तुम्ही अभिनेत्री दिव्या खोसला कुमारची स्टोरी वाचाल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल.
Divya Khosla Kumar Unheard Story: सगळ्यांना प्रश्न पडला असेल की, एक फ्लॉप सिनेमामुळं आयुष्य कसं काय चमकू शकते. मात्र तुम्ही अभिनेत्री दिव्या खोसला कुमारची स्टोरी वाचाल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल. तेव्हा खरं लक्षात येईल हा चमत्कार कसा झाला.
2/ 11
दिव्या खोसला कुमारनं (Divya Khosla Kumar) 18 व्या वर्षी मॉडलिंगला सुरूवात केली आणि 20 व्या वर्षी मुंबईत आली. मुंबईत तिला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. यावेळी तिची भेट भूषण कुमार यांच्यासोबत भेट झाली.
3/ 11
दिव्यानं उदय किरणसोबत 2004 मध्ये 'लव्ह टुडे' या तेलुगू चित्रपटातून तिने अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
4/ 11
त्यानंतर 2004 मध्ये फाल्गुनी पाठक यांनी गायलेल्या 'आयो रामा' या पॉप गाण्याच्या व्हिडिओमध्येही ती दिसली आणि त्याच वर्षी तिने 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो से' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
5/ 11
या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि बॉबी देओलसोबत दिसली होती, मात्र तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.
6/ 11
खऱ्या अर्थानं दिव्याचं आय़ुष्य यानंतर बदललं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटादरम्यान टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांची दिव्या खोसला हिच्याशी भेट झाली आणि मग दोघांमध्ये जवळीक वाढू लागली.
7/ 11
दोघांनी फोनवर बोलायला सुरुवात केली आणि 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों से' प्रदर्शित झाल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2005 मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली.
8/ 11
अशाच एका फ्लॉप चित्रपटाने दिव्याचे नशीब उघडले, तिला तिचं प्रेम आणि जीवनसाथी मिळाला. लग्नाच्या 18 वर्षांनंतरही या दोघांच्यातील केमिस्ट्री आहे तशी पाहायला मिळते.
9/ 11
दिव्याने तिच्या सोशल नेटवर्किंग साइट इन्स्टाग्रामवर भूषणसोबतचे फोटो शेअर करत असते. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून दिव्याची कारकीर्द काही खास नव्हती, पण आता तिने चित्रपटांची निर्मिती सुरू केली आहे.
10/ 11
दिव्या आजकाल सतत व्हिडिओ अल्बममध्ये अभिनय करताना दिसत असून त्यात तिला यशही मिळत आहे.
11/ 11
त्याचबरोबर नुकताच तिनं 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही त्याला यश मिळाले नाही. या चित्रपटात ती जॉन अब्राहमसोबत झळकली होती, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला