

दबंग खान सलमानसोबत भारत सिनेमानंतर अभिनेत्री दिशा पाटनीच्या चाहत्यांमध्ये खूप वाढ झाली आहे. या सिनेमातील दिशाच्या स्टंटचं खूप कौतुक झालं. मात्र यासाठी ती प्रचंड मेहनत घेत असल्याचं तिचं सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यावर लक्षात येतं.


दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फिटनेस व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिनं सोशल मीडियावर शेअर केलेले काही फोटो चाहत्यांना परफेक्ट बॉडी गोल्स देत आहेत.


दिशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एकामागोमाग एक चार फोटो शेअर केले आहेत. ज्यासोबत तिनं चाहत्यांसाठी काही मोटिव्हेशनल टिप्स सुद्धा शेअर केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत.


दिशा या फोटोमध्ये व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये दिसत असून तिच्या चेहऱ्यावर हलकासा सूर्यप्रकाश दिसत आहे. हे फोटो शेअर करताना दिशानं काही 'मोटिव्हेशनल कोट्स' शेअर केले आहेत.


दिशानं या फोटोला कॅप्शन देताना लिहिलं, 'तुम्ही जे काल होता, त्यापेक्षा अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करा.'


दिशा पाटनी लवकरच 'मलंग' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातही तिचे काही स्टंट सीन आहेत. सिनमाच्या शूटिंग दरम्यान दिशाला पुन्हा एकदा दुखापत झाली होती. यावेळचा इंजेक्शन घेतानाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


दिशा तिच्या फिटनेसबाबत खूपच जागरुक आहे. तिने काही दिवसांपूर्वी स्वतःचा एक बॅक फ्लिप व्हिडिओ शेअर केला होता. जो खूप व्हायरल झाला होता.