'तुमच्यासोबत आणखी काही वेळ..' वडिलांच्या आठवणीत भावुक झाली 'देवमाणूस'फेम ACP दिव्या
Father's Day 2022: आज सर्वत्र 'फादर्स डे' साजरा केला जात आहे. वडिलांच्या प्रति आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी हा खास दिवस असतो. यानिमित्ताने 'देवमाणूस' फेम ACP दिव्या अर्थातच अभिनेत्री नेहा खानने आपल्या वडिलांसोबतचा अनसीन फोटो शेअर करत आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.
|
1/ 8
आज सर्वत्र 'फादर्स डे' साजरा केला जात आहे. वडिलांच्या प्रति आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी हा खास दिवस असतो. यानिमित्ताने 'देवमाणूस' फेम ACP दिव्या अर्थातच अभिनेत्री नेहा खानने आपल्या वडिलांसोबतचा अनसीन फोटो शेअर करत आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.
2/ 8
'देवमाणूस' या लोकप्रिय मालिकेतून नेहा खान घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत तिने ACP दिव्याची भूमिका साकारत सर्वांचं मन जिंकलं होतं.
3/ 8
नेहा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधत असते.
4/ 8
आज अभिनेत्रीने 'फादर्स डे'च्या निमित्ताने आपल्या वडीलांसोबतच अनसीन फोटो शेअर केला आहे.
5/ 8
सोबतच अभिनेत्रीने इमोशनल कॅप्शन देत लिहलय, ''तुमच्यासोबत आणखी काही वेळ घालवण्याची माझी ईच्छा होती'', मिस यु.. लव्ह यु'.
6/ 8
नेहा खानला 'देवमाणूस' या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
7/ 8
त्यामुळेच प्रेक्षक तिला 'देवमाणूस 2' मध्येसुद्धा पाहण्याची ईच्छा व्यक्त करत आहेत.
8/ 8
सध्या ही अभिनेत्री 'सायबर वार'या हिंदी वेबसीरीजमध्ये काम करत आहे.