ACP दिव्याची होणार 'देवमाणूस 2' मध्ये एन्ट्री? अभिनेत्रीच्या 'त्या' पोस्टमुळे होतेय चर्चा
Devmanus 2: झी मराठी (Zee Marathi) वरील मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) मधून घराघरात पोहोचलेली एसीपी दिव्या सिंग (Divya Singh) म्हणजेच अभिनेत्री नेहा खान होय.
|
1/ 8
झी मराठी (Zee Marathi) वरील मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) मधून घराघरात पोहोचलेली एसीपी दिव्या सिंग (Divya Singh) म्हणजेच अभिनेत्री नेहा खान होय.
2/ 8
'देवमाणूस' या मालिकेच्या पहिल्या भागात दिव्या बनून नेहाने चाहत्यांना भुरळ घातली होती. '
3/ 8
सध्या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या भागातसुद्धा सर्वच जुने कलाकार पाहायला मिळत आहेत.
4/ 8
मात्र या भागात अजूनही नेहा खानची एन्ट्री झालेली नाही. त्यामुळे ती मालिकेत कधी येणार किंवा येणार की नाही याची उत्सुकता लागली आहे.
5/ 8
नुकतंच नेहाने खाकी वर्दीतील आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून ती पुन्हा देवमाणूसमध्ये परतणार आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
6/ 8
मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो अभिनेत्रीचा हा लुक तिची आगामी वेबसीरिज 'सायबर वार' मधील आहे. जो आजपासून वूटवर पाहायला मिळणार आहे.
7/ 8
त्यामुळे नेहा सध्या तर मालिकेत परतणार नाही हे निश्चित आहे.
8/ 8
नेहा खानला चाहते या मालिकेच्या दुसऱ्या भागात प्रचंड मिस करताना दिसून येतात.