

बॉलिवूडमध्ये सध्या टॅटूची विशेष क्रेझ आहे. दापिका पदुकोण ते प्रियांका चोप्रा पर्यंत सर्वांनीच आपल्या शरीरावर वेगवेगळे टॅटू गोंदवले आहेत आणि टॅटूंमुळे या सर्व अभिनेत्री चर्चेतही राहिल्या. काहींनी सिनेमाची गरज म्हणून टॅटू बनवला तर तर काहींनी या टॅटूमधून आपलं प्रेम व्यक्त केलं. पाहूया बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीचे खास फॅशनेबल टॅटू...


बॉलिवूड क्वीन कंगना रनौत नेहमीच तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. तिच्याप्रमाणे तिचा टॅटू सुद्धा वेगळा आहे. तिनं मानेवर 'sword with wings' असा टॅटू रेखाटून घेतला आहे.


सुष्मिता सेनच्या हातावर 'Aut viam inveniam aut faciam' असा टॅटू आहे. याशिवाय तिच्या हात आणि पाठीवर आणखी 3 टॅटू आहेत.


अभिनेत्री दीपिका पदुकोणनं आपल्या मानेवर एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरचा RK हा टॅटू गोंदवला होता. पण 2010मध्ये त्यांचा ब्रेकअप झाल्यावर तिनं हा टॅटू पुन्हा डिझाइन केला. याशिवाय तिच्या पायावरही एक टॅटू आहे.


आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री आलियाचा टॅटू सुद्धा तिच्यासारखाच हटके आहे. तिनं आपल्या मानेवर 'पटाका' असं लिहिलेला टॅटू गोंदवून घेतला आहे.


राखी सावंत म्हणजे वादाचं दुसरं नाव असं म्हटलं जातं. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेत्रींपैकी सर्वात जास्त टॅटू राखीनं गोंदवून घेतले आहेत.