Year Ender2021: दीपिका पादुकोण अशी देतेय सरत्या वर्षाला निरोप, पाहा PHOTO
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आपल्या नुकताच रिलीज झालेल्या '83' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आले होते.
|
1/ 7
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष लागून असतं. ती सतत आपल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेते
2/ 7
सरत्या वर्षाच्या शेवटी अभिनेत्रीने आपल्या फोटोंचं गाठोडं उघडलं आहे. अभिनेत्रीने ट्रॅव्हलिंग पासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्व आवडते फोटो शेअर केले आहेत.
3/ 7
दीपिकाकडे आपल्या आवडत्या गोष्टी खाद्यपदार्थ, फुले आणि प्रवासाचे अनेक फोटो आहेत.
4/ 7
दीपिका पादुकोण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार आहे. नुकताच ती पती रणवीर सिंहसोबत मुंबई एयरपोर्टवर दिसून आली होती.
5/ 7
याचाच अर्थ ती रणवीरसोबत परदेशात नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे. मात्र ती कोणत्या ठिकाणी गेली आहे याचा खुलासा झालेला नाही.
6/ 7
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आपल्या नुकताच रिलीज झालेल्या '८३' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आले होते.
7/ 7
या चित्रपटात रणवीर सिंहने कपिल देव याची तर दीपिका पादुकोणने त्यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारली आहे.