बॉलिवूडमधील कलाकार किती मानधन घेतात हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमी मानधन मिळत असे. पण आता त्यात हळूहळू बदल होत आहे. अनेक स्त्री केंद्रीत सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला मिळवला आहे. बी-टाउनच्या या 'हसीना' अॅक्शन, स्टंट, स्टारडम आणि तगडी फीज यामध्ये अभिनेत्यांना टक्कर देत आहेत.
बॉलिवूडमध्ये 'पद्मावत', 'राम लीला', 'बाजीराव मस्तानी' यासारख्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणाऱ्या सिनेमात मुख्य भूमिका दीपिकाची होती. ओम शांती ओममधून पदार्पण केलेली दीपिका पादुकोण ही अभिनेत्री आजची एक टॉप अभिनेत्री मानली जाते. रिपोर्ट्सनुसार, दीपिका प्रति फिल्म 15 ते 30 कोटी रुपये चार्ज करते. दीपिका सध्याच्या घडीची सर्वात महागडी अभिनेत्री आहे.
बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच करीना कपूर खान इंडस्ट्रीत तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. मुलगा जेहच्या जन्मापासून ती चित्रपटांपासून दूर आहे. अलीकडेच तिने एका चित्रपटात सीतेची भूमिका करण्यासाठी तिने 12 कोटी रुपये चार्ज केल्याचे वृत्त समोर आले होते. याबाबत अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले तरी तिच्या लोकप्रियतेमुळे ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे