

लग्नात कपडे, डेकोरेशन, जागा, गिप्ट आणि दागिने याकडे सर्वच लक्ष देत असतात. पण दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने लग्नाला खास बनवण्यासाठी लग्नातील जेवणावर भर दिला आहे. लग्नातील शेफ समोर काही अशी अट ठेवण्यात आली आहे ज्यामुळे काय करावं असा प्रश्न शेफला पडला आहे.


रणवीर आणि दीपिका यांची अट ऐकून तुम्हाला राजा महाराजांच्या लग्नाची आठवण येईल. त्यांनी शेफला सांगितले आहे की, लग्नात बनवलेला पदार्थ हा लग्नानंतर दुसरीकडे कुठेही बनवला नाही. ते पदार्थ फक्त आमच्याच लग्नात निर्माण करण्यात आले असतील. असा करार त्यांनी शेफसोबत केला आहे.


दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची चर्चा सगळीकडे आहे. लग्नात दीपिका-रणवीर कसे दिसणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या लग्नाच्या तयारीसाठी दीपिकाचे विदेश दौरे चालू आहेत.


सध्या दीपिका आणि रणवीर प्री-वेडींग करत असल्याची माहिती मिळाली आहे. फॅशन डिजाईनर सब्यसाची मुखर्जी दीपिकाला सजवणार असल्याने तिचे प्री-वेडींगचे फोटोज इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.


सब्यसाची मुखर्जीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत दीपिकाला शुभेच्छा दिल्या. येत्या 14 आणि 15 नोव्हेंबरला रणवीर दीपिकाचे इटलीमध्ये लग्न होणार आहे आणि त्यानंतर मुंबई, बंगळुरू इथे त्यांचे रिसेप्शन होणार आहे.