

बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात रणवीर-दीपिका आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मागच्या वर्षी 14 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमो येथे हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले.


लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं निमित्तानं रणवीर आणि दीपिकानं तिरुमला येथील वेंकटेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं.


रणवीर आणि दीपिकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ज्यात दीपिकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहताना दिसत आहे.


दीपिकानं यावेळी लाल रंगाची साडी परिधान केली होती. तसेच गोल्ड ज्वेलरी आणि भांगातील कुंकू तिच्या सौंदर्यांत आणखीच भर घालत होतं. तर रणवीरनं गोल्डन आणि पिंक कलरची शेरवानी घातली होती.


दीपिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट करत, 'लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला तिरुपती येथील व्यकटेश्वराचं दर्शन घेतलं. तुम्ही सर्वांनी दिलेल्या आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद' असं कॅप्शन दिलं.