'आई' हा असा शब्द आहे ज्यात शब्दांपेक्षा भावना जास्त आहेत. आई ही प्रेम आणि त्यागाची ती मूर्ती आहे, जिची बरोबरी कोणीही करू शकत नाही. 'मदर्स डे' हा आईच्या प्रेमाला आणि मातृत्वाला समर्पित केलेला एक खास दिवस आहे. जो मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यावर्षी 8 मे 2022 रोजी मदर्स डे साजरा केला जात आहे. यावर्षी पहिल्यांदाच आई-वडील झालेल्या सर्व सेलिब्रिटींसाठीही यंदाचा मदर्स डे खूप खास आहे.