आज पर्यंत बोटावर मोजण्याइतक्याच कलाकारांनी पडाद्यावर श्री दत्तगुरूंची भूमिका साकारली आहे. त्यामध्ये मंदार जाधवचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून घराघरात पोहचलेल्या जयदीप म्हणजेच मंदार जाधवने याआधी छोट्या पडद्यावर श्री दत्तगुरूंची भूमिका साकारली आहे. स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत त्याने श्री दत्तांची भूमिका साकारली होती. श्री गुरुदेव दत्त मालिकेतल्या मंदारच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. या मालिकेतील त्याचा गुरुदेव दत्तांचा लूक लक्षवेधी ठरला होता. श्री गुरुदेव दत्तांच्या भूमिकेसाठी मंदारने विशेष मेहनत घेतली होती. अल्पावधीतच या मालिकेने लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. दत्तगुरुंची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे. खूप मोठी जबाबादारी आहे' असं या भूमिकेविषयी मंदार जाधव म्हणाला होता.