HBD: 'दंगल गर्ल' फातिमा सना शेखला वाटते लग्नाची भीती! स्वतः सांगितलं होतं कारण
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म हैद्राबादमध्ये झाला होता.
|
1/ 8
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म हैद्राबादमध्ये झाला होता. आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवलं होतं. या चित्रपटात तिने आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारली होती.
2/ 8
फातिमा सना शेखकडे सध्या अनेक चांगले प्रोजेक्टस आहेत. प्रोफेशनल लाईफमध्ये बिनधास्त असणारी ही अभिनेत्री आपल्या पर्सनल लाईफमध्ये लग्नाला फारच घाबरते.
3/ 8
इतकंच नव्हे तर एका मुलाखती दरम्यान फातिमा सना शेखने असंसुद्धा म्हटलं होतं, कि ती कधीच लग्न नाही करणार.
4/ 8
अभिनेत्रीने आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावाप्रमाणे स्पष्टीकरण देत म्हटलं होतं, 'जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तर त्यासाठी कोणत्याही कागदपत्राची काय आवश्यकता आहे?'.
5/ 8
फातिमाने दंगलपूर्वीही काम केलं आहे. परंतु या चित्रपटाने तिला खास ओळख मिळवून दिली होती.
6/ 8
फातिमाने चित्रपट नव्हे तर छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. परंतु फारच कमी लोकांना याबद्दल माहिती आहे.
7/ 8
बालपणी फातिमा सना शेखने 'चाची 420' मध्ये कमल हसन आणि तब्बूच्या मुलीची भूमिका साकारली होती.
8/ 8
फातिमा सना शेखचं नाव आमिर खानसोबत जोडलं जातं. हे दोघे एकेमकांच्या प्रेमात असलायचं म्हटलं जातं. मात्र दोघांनीही या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.