डॅडी म्हणजेच अरुण गवळी (Arun Gawali) हे काहीच दिवसांपूर्वी आजोबा झाले होते. तर आता ते आपल्या नातीला भेटायला गेले आहेत. पाहा त्यांचे खास फोटो. अरुण गवळींची लेक योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे हे मागील महिण्यात आई-बाबा झाले होते. अरुण गवळींनी आता आपल्या नातीला भेटण्याचं सुखं अनुभवलं आहे. याचे काही फोटो अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अक्षय - योगिताने मुलीचं नाव अर्ना असं ठेवलं आहे. नातीला भेटून डॅडींना फारच आनंद झाल्याचं दिसत आहे. सोबत त्यांची पत्नी देखील होती. 8 मे रोजी योगिताने मुलीला जन्म दिला होता. विशेष म्हणजे अक्षय आणि योगिताच्या लग्नवाढदिवशीच त्यांच्या मुलीचाही जन्म झाला होता. अक्षयने काही मराठी चित्रपट तसेच मालिकेंमध्ये काम केलं आहे. मागील वर्षी दगडी चाळीत 8 मे ला दोघांनीही विवाह केला होता.