सनी लियोनीने नुकतेच आपल्या तीन मुलांचे आणि बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. सनीची मुलगी निशा 6 वर्षांची झाली, त्यानिमित्त तिने हे फॅमिली सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
2/ 9
सनी लियोनीच्या तिच्या तिन्ही मुलांमध्ये छान बाँडिंग दिसतंय. सनीने निशाचा वाढदिवस आपल्या घरीच साजरा केला आहे. त्यासाठी तिने आपल्या घराचं अतिशय छान पद्धतीने डेकोरेशनही केल्याचं दिसत आहे.
3/ 9
सनीने निशाला लहानपणीच दत्तक घेतलं आहे.
4/ 9
सनीचा नवरा डॅनियल वेबरही या फोटोंमध्ये दिसतोय.
5/ 9
सनी लियोनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिला इन्स्टाग्रामवर 48 लाख लोक फॉलो करतात.
6/ 9
निशाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मल्टीकलर फ्लावरप्रिंट फ्रॉक घातलेला होता. त्यात ती फार क्यूट दिसत आहे.
7/ 9
सनी लियोनीने 2017 साली निशाला आपलं अपत्य म्हणून दत्तक घेतलं होतं. त्यानंतरपासून तिने निशाला आपली मुलगी मानलं होतं.
8/ 9
सनीने या फोटोंसोबत तिचा पती डॅनियल वेबरसोबतही एक फोटो शेयर केला आहे. त्यामुळं आता या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाइक करण्यात येत आहे.
9/ 9
सनीने निशाचा वाढदिवस आपल्या टिमसोबत साजरा केला असून त्याचेही फोटो शेयर केले आहेत. (फोटो साभार: sunnyleone/Instagram)