

अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर आपल्या नात्याचं स्पेशल बाँडिंग शेअर करताना दिसते.


सुष्मिता आणि रोहमन यांची भेट एका इव्हेंटमध्ये झाली होती. बराच काळ एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनाही आपल्या नात्याची जाहीर कबूली दिली. त्यानंतर ते अनेक कार्यक्रमांना एकत्र दिसतात.


रोहमन आणि सुष्मिताच्या दोन्ही मुलींचं एकमेकांशी चांगलं बाँडिंग आहे याशिवाय काही दिवसांपूर्वी रोहमन सुष्मिताच्या फॅमिली फंक्शनमध्येही दिसला होता. या दोघांमधील वाढती जवळीक पाहता हे दोघंही लवकरच लग्न करतील असा अंदाज लावला जात आहे.


सध्या सुष्मिता आणि रोहमन न्यूयॉर्क ट्रिपवर आहेत आणि याची माहिती सुष्मितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. पण तिच्या इन्स्टाग्रामवरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.


सुष्मितानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती रोहमनसोबत न्यूयॉर्कमधील रस्त्यांवर धावताना दिसत आहे. या फोटोला सुष्मितानं 'come run away with me' असं कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर होत असलेला हा फोटो 89 हजारांहून जास्त लोकांनी लाईक केला आहे.