राजा राणीची ऑन ड्युटी वटपौर्णिमा, लतिका-आभ्याचा दुरावा मिटणार? पाहा वटपौर्णिमेला काय वळण येणार
'राजा राणीची गं जोडी'मध्ये इन्स्पेक्टर संजीवनी ढाले पाटील यावेळी ऑन ड्युटी वटपौर्णिमा साजरी करणार आहे.
|
1/ 6
कलर्स मराठी वाहिनीची लोकप्रिय मालिका 'राजा राणीची गं जोडी'मध्ये यावेळी अनोखी वटपौर्णिमा दिसणार आहे. पाहा काय असणार विशेष.
2/ 6
'राजा राणीची गं जोडी' मध्ये राणी म्हणजेच मालिकेतील संजीवनी आता इन्स्पेक्टर झाली असल्याने आपल्या कर्तव्यात कोणतीही कमतरता येऊ देत नाही. तर यावेळी ती चक्क ऑन ड्युटी वटपौर्णिमा साजरी करताना दिसणार आहे.
3/ 6
मालिकेत सध्या संजीवनीची तारेवरची कसरत पाहायला मिळत आहे. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून ती नोकरी करत आहे. तर नोकरीवरही तिच्या वरिष्टांचा जाच तिला सहन करावा लागत आहे.
4/ 6
पण या सगळ्या परिस्थितीतही रणजीत तिच्या मागे ठाम उभा असल्याचं दिसत आहे. तो तिला वेळोवेळी मदत करत आहे. तर तिच वटसावित्रीची व्रत पूर्ण करण्यासाठी त्याने ड्युटीवर तिला पुजेचं सामान आणून दिलं आहे.
5/ 6
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतही अनोखी वटपौर्णिमा पाहायला मिळणार आहे. लतिका पारंपरिक वेशात अभिमन्यू सोबत वटपौर्णिमा साजरी करताना दिसणार आहे.
6/ 6
त्यामुळे अभिमन्यू आणि लतिकामधील दुरावे आता दूर होणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.