‘वाघले की दुनिया’मध्ये झळकणारी साक्षी आहे तरी कोण?
हिंदी मालिकेत मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोलबाला; पाहा वाघले की दुनियामधील साक्षीची रिअल लाईफ
|
1/ 9
‘वाघले की दुनिया’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर प्रचंड चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
2/ 9
80च्या दशकात वाघले की दुनिया ही मालिका सुपरहिट ठरली होती. तब्बल ३० वर्षानंतर या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
3/ 9
या मालिकेत सुमित राघवन, आतिश कपाडिया, अंजन श्रीवास्तव, भारती आचरेकर यांसारखे अनेक नामांकित कलाकार झळकत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
4/ 9
परंतु यामध्ये अभिनेत्री चिन्मयी साळवी मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
5/ 9
या मालिकेत साक्षी नामक एका चुणचुणीत मुलीची भूमिका साकारणारी चिन्मयीनं आपल्या जबरदस्त अभिनयानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
6/ 9
तिनं नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
7/ 9
या मालिकेत तिनं पुर्णा ही व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
8/ 9
या व्यक्तिरेखेसाठी तिला सोनी मराठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
9/ 9
चिन्मयीनं टीव्हीवर अद्याप फारसं काम केलेलं नाही मात्र रंगभूमीवर मात्र ती लहानपणापासूनच काम करत आहे. अलिकडेच तिचं मी आणि मी नाटक प्रचंड गाजलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)