Navratri 2021: बंगाली दुर्गापूजा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी काजोल दर्शनाला पोहोचली. उत्तर मुंबईतील सारबोजनीनमध्ये दुर्गामातेचं दर्शन घेतलं. गुलाबी साडीतले तिचे हे फोटो VIRAL झाले आहेत.
बंगाली दुर्गापूजा सुरू झाल्यानंतर आता बॉलिवूड सेलेब्रिटींचा उत्साह टिपेला पोहोचला आहे. काजोल दरवर्षीप्रमाणे दुर्गामातेच्या दर्शनाला पोहोचली.
2/ 8
दरवर्षी बॉलिवूडचा मुखर्जी परिवार दुर्गापूजा मोठ्या धडाक्यात साजरा करतो. काजोल, राणी मुखर्जी, अयान मुखर्जी यांच्यासह स्टार सेलिब्रिटी दुर्गामातेच्या दर्शनासाठी पोहचत असतात. काजोलचे हे ताजे फोटो लक्ष वेधून घेत आहेत.
3/ 8
काजोलने नेसलेल्या साध्याच पण ट्रेंडी गुलाबी साडीने लक्ष वेधून घेतलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/ 8
मागच्या वर्षी कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी व्हर्चुअल पद्धतीने दर्शनाची तयारी केली होती. आता राज्यात मंदिरं उघडल्यामुळं काजोल दर्शनासाठी दुर्गापूजा पेंडालमध्ये आली होती.
5/ 8
काजोल मंडपात आली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिने आपल्या कुटुंबीयांसोबत फोटोसेशनही केलं.
6/ 8
फोटो सौजन्य -Viral Bhayani इन्स्टाग्राम
7/ 8
फोटो सौजन्य -Viral Bhayani इन्स्टाग्राम
8/ 8
काजोल दर्शनासाठी एकटीच मंदिरात आली होती. या वेळी तिच्याबरोबर तिची मुलं किंवा पती अजय देवगण उपस्थित नव्हते. फोटो साभार: Viral Bhayani)