Cannes film festival 2022 - कान्स फिल्म सोहळ्यात यंदा अनेक बॉलिवूड सेलेब्स सहभागी होणार आहेत. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादुकोण, हिना खान, पूजा हेगड़े, अदिती राव हैदरी आणि नयनतारा यांचा समावेश आहे. दीपिका सर्वात पहिल्यांदा कान्समध्ये पोहचली आहे. तर ऐश्वर्या आपली मुलगी आराध्या आणि नवरा अभिषेकसोबत फ्रान्सला रवाना झाली आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.
मुंबई विमानतळावरून व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये लोकांना ऐश्वर्याचा एअरपोर्ट लुक खूपच क्यूट दिसत होता. यावेळी ऐश्वर्याने काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केलेला दिसत होता. ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्या गुलाबी रंगाच्या हुडीमध्ये दिसली. अभिषेक देखील कपाळावर तिला लावून निळ्या रंगाची हुडी आणि डेनिम पॅन्ट परिधान केलेल्या लुकमध्ये दिसला.