कान्स महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्रींनी जगाचं लक्ष वेधलं आहे. दीपिका पादुकोणनंतर आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कान्स महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उर्वशी रौतेला व्हाईट कलरच्या रफल गाऊनमध्ये. या लॉन्ग गाऊनमध्ये अभिनेत्री एखाद्या परिकथेतील परीसारखी भासत होती. उर्वशीचा हा लुक सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर उर्वशीने आपले फोटो शेअर केल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. फक्त आऊटफिट्स नव्हे तर अभिनेत्रीच्या मेकअपचीदेखील अनेकांना भुरळ पडली आहे. केसांचा बन आणि डार्क रेड लिपस्टिकमुळे अभिनेत्रीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.