2020 वर्षाला अलविदा करण्याची करीनाची हटके स्टाइल; PHOTO पाहून तुम्हीही म्हणाल, वाह बेबो
2020 च्या शेवटच्या दिवशी करीना कपूरने (Kareena Kapoor Khan) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि तैमूरसोबतचे (Taimur) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 2020 मधील आठवणींना उजाळा देण्याची तिची हटके स्टाइल अनेक चाहत्यांना आवडली आहे.


सैफ अली खान (Saif Ali Khan), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तैमूर (Taimur) हे चाहत्यांचं आवडतं कुटुंब आहे. करीना सोशल मीडियावर अतिशय सक्रीय असते. 2020 मधले काही फोटो करीनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


या फोटोंमध्ये करीना कपूरचा नो मेक अप लूक दिसून येत आहे. या तिघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


करीना आणि सैफ तैमूरसोबत फॅमिली टाइम घालवत आहे. हे फोटो शेअर करताना करीनाने काही कॅप्शनही दिले आहेत.


करीनाने लिहीलं आहे, ‘माझ्या कुटुंबातील या जवळच्या व्यक्तींशिवाय मला 2020 चं हे वर्ष घालवणं शक्यच नव्हतं. नव्या वर्षाची सुरूवातही मी त्यांच्या सोबतच करत आहे. मित्रांनो, तुम्हीदेखील सुरक्षित रहा, आमच्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा’.


काही दिवसांपूर्वी कपूर कुटुंबामध्ये ख्रिसमस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी करीना सैफ आणि तैमूरसोबत त्या पार्टीत दिसून आली. हा फोटो अतिशय व्हायरल झाला होता.


करीना तिच्या सोशल मीडियावर नेहमीच तैमूर आणि सैफ सोबतचे फोटो शेअर करत असते. मार्च महिन्यात करीनाने इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केलं तेव्हा हा फॅमिली फोटो शेअर केला होता. यात ती अतिशय हॉट दिसत आहे.


करीना कपूर आणि सैफ अली खान दुसऱ्यांदा आई वडील होणार आहेत. मार्च महिन्यात करीना कपूरच्या बाळाचा जन्म होणार आहे.