

कोणाचं भाग्य कधी उजळेल काही सांगता येत नाही. असंच काहीसं घडलं आहे, बल्गेरिया(Bulgaria)च्या एका मॉडेलचं. क्रिस्टीन कामेनोवा पेशाने मॉडेल आहे. ती रातोरात स्टार झाली आहे. तिच्या इंन्टाग्राम अकाऊंटावर फॉलोअर्सचा नुसता पाऊस पडतोय.


आता ही क्रिस्टीन कामेनोवा इतकी चर्चेत का आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर क्रिस्टीनला ‘मिस सिलिकॉन स्टार’ हा पुरस्कार मिळाला होता. यामुळे तिची सध्या जोरदार चर्चा होत आहे.


क्रिस्टीन तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंवर अनेक लाइक्स आणि कॉमेंट्स येत असतात. विशेष म्हणजे, क्रिस्टीनने ब्रेस्ट सर्जरी करण्यासाठी कर्ज घेतलं होतं. पण आता ती अफाट श्रीमंत झाली आहे.


ब्रेस्ट इम्प्लांट करण्याआधी तिला अनेकांनी ब्रेस्ट सर्जरी न करण्याचा सल्ला दिला होता. ब्रेस्ट सर्जरी आरोग्यासाठी घातक आहे असं तिला अनेकांनी सांगितलं. पण तिने कोणाचही न ऐकता ब्रेस्ट सर्जरी केली होती. क्रिस्टीन आता 31 वर्षाची आहे आणि तिने आत्तापर्यंत 3 वेळा ब्रेस्ट सर्जरी केली आहे. पहिली ब्रेस्ट सर्जरी तिने वयाच्या 18 व्या वर्षी केली होती.