मंदिरा बेदीसोबतचं तब्बल 25 वर्षाचं नातं मधेच सोडून पती राज कौशलने जगाचा निरोप घेतला आहे. या सुंदर जोडीवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बॉलिवूड आणि चाहते सर्वचजण दुख व्यक्त करत आहेत. राजच्या अशा अचानक जाण्याने मंदिराही हादरून गेली आहे.
2/ 12
आज अचानक हृदयविकाराच्या झटक्याने राज कौशलचं दुखद निधन झालं आहे.
3/ 12
राज आणि मंदिरा यांचं लव्हस्टोरीसुद्धा तितकीच रंजक होती.
4/ 12
राज यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं, की मंदिराने 'दिलवाले दुल्हनिया ळे जायेंगे' मध्ये काम केलं होतं. मात्र मी त्यावेळी तिच्यावर इतक लक्ष नव्हत दिलं.
5/ 12
राज आणि मंदिरा यांची पहिली भेट मुकुंद आनंद यांच्या घरी झाली होती.
6/ 12
मंदिराला तिथे एका ऑडीशनसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी राज हे मुकुंद आनंद यांच्यासोबत चीफ असिस्टंट म्हणून काम करत होते.
7/ 12
त्यानंतर त्यांच्यात भेटी सुरु झाल्या.
8/ 12
मात्र अवघ्या तीन भेटीतच राज मंदिराकडे आकर्षित झाले होते.
9/ 12
इतकच नव्हे तर त्यांना वाटू लागलं होतं की हेच आपल्या आयुष्यातील खर प्रेम आहे.
10/ 12
मंदिरा आणि राज यांनी 1999 मध्ये लग्न केल होतं.
11/ 12
लग्नाच्या तब्बल 12 वर्षानंतर मंदिराने एका मुलाला जन्म दिला होता. तसेच या जोडप्याने गेल्यावर्षी एक मुलगीसुद्धा दत्तक घेतली आहे.
12/ 12
मंदिरा आणि राज दोघेही आपल्या मित्रपरिवारा सोबत खुपचं खुल्या विचाराने जगत होते.