हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांचं ब्रेकअपसुद्धा बरचं वादग्रस्त ठरलं होतं. 'क्रिश 3' च्या निमित्ताने ही जोडी समोर आली होती. मात्र पुढे कंगनाने हृतिकवर धोका दिल्याचा आरोप करून खळबळ माजवली होती. मात्र हृतिकसुद्धा गप्प बसला नव्हता, त्याने हे सर्व आरोप खोटं असल्याचं सांगत तिच्यावर मानहानीची तक्रार दाखल केली होती.
कधीकाळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची लव्हस्टोरीसुद्धा खुपचं चर्चेत होती. मात्र या दोघांचंसुद्धा ब्रेकअप झालं होतं. अक्षयने नंतर ट्विंकलसोबत लग्न केलं होतं. त्यावेळी शिल्पाने म्हटलं होतं,' दुसरी कोणी मिळाली म्हणून मला इतक्या सहजपणे सोडलं' त्यामुळे हा ब्रेकअपसुद्धा खुपचं वादग्रस्त ठरला होता.