

आयपीएलच्या क्लोजिंग सेरेमनीला बॉलिवूड कलाकार हजेरी लावणार आहेत. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारंचे दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. मात्र यात सलमान खान आणि कतरीना कैफ यांचं खास आकर्षण असेल. असं सांगितलं जातंय की, सलमान आणि कतरीना या इव्हेंटमध्ये त्याच्या भारत सिनेमाच प्रमोशन करणार आहे. याशिवाय फायनल मॅच दरम्यान सलमान आणि कतरीना एक सेगमेंट होस्ट करणार आहेत.


सलमान आणि कतरीनाच्या या सेगमेंटला आईपीएल ऑफिशियल ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दाखवण्यात येणार आहे. यावेळी लहान मुलांशी संबंधित एक जाहीरातही दाखवली जाणार आहे जी सलमाननं याआधीच शूट केली आहे.


अली अब्बास जफर यांच दिग्दर्शन असलेला 'भारत' हा सिनेमा भारत-पाकिस्तान फाळणीचा काळ प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या सिनेमात सलमान खान वेगवेगळ्या पाच लुकमध्ये दिसत आहे.


खरंतर आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला बॉलिवूड कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स होणार होते. मात्र 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर ही ओपनिंग सेरेमनी रद्द करण्यात आली.


या अगोदर झालेल्या प्रत्येक आयपीएलच्या सेरेमनीला बॉलिवूड कलाकारांनी परफॉर्मन्स दिले आहेत. मागच्या वर्षी कतरीना कैफच्या परफॉर्मन्सचं सर्वाधिक कौतुक झालं होतं. त्यामुळे यंदाही तिच्या परफॉर्मन्सकडे सर्वांचं लक्ष असेल.