आशा पारेख: शम्मी कपूर, शशी कपूर यांसारख्या अभिनेत्यांबरोबर रोमँटिक चित्रपट गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने अविवाहितच राहायचा निर्णय घेतला. नासिर हुसेन यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्यांच्याबद्दल बोललं जायचं, पण हे नातं विवाहापर्यंत पोहोचलंच नाही. वयाच्या 80 च्या जवळ पोहोचलेल्या आशा पारेख यांची आई बोहरा मुस्लीम होती, तर वडील हिंदू.