

टेलिव्हिजन होस्ट आणि गायक आदित्य नारायण मंगळवारी लग्नाच्या बेडीत अडकला. 1 डिसेंबर रोजी अभिनेत्री श्वेता अग्रवालशी त्याने लग्न केलं. (फोटो सौजन्य-@adiholic_till_last_breath/Instagram)


वधूवराच्या पोषाखात दोघांची जोडी साजेशी दिसत आहे. आदित्य-श्वेताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य-@adiholic_till_last_breath/Instagram)


यावेळी आदित्यने क्रीम रंगाची शेरवानी तर श्वेताने सफेद-गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. या ट्रेडिशनल लुकमध्ये दोघांचा जोडा खुलून दिसत आहे. (फोटो सौजन्य-@adiholic_till_last_breath/Instagram)


श्वेता-आदित्यचं लग्न जुहूच्या इस्कॉन मंदिरात पार पडलं. (फोटो सौजन्य-@adiholic_till_last_breath/Instagram)


आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालचा लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने विधीवत पार पडला. (फोटो सौजन्य-@adiholic_till_last_breath/Instagram)


यावेळी आदित्यने श्वेताचा हात पकडून सातफेरे घेतले. सोशल मीडियावर आदित्यच्या फॅनपेजेसवर त्यांच्या लग्नातील फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. काही क्षणातच त्यांचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य-@adiholic_till_last_breath/Instagram)