

तसं पाहीलं गेलं तर भारतीय संस्कृतीत लग्नानंतर नवरी नवऱ्याच्या घरी जाते. पण, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या बाबतीत ही गोष्ट थोडी वेगळी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका रणवीच्या घरी नाही तर रणवीर दीपिकाच्या घरी राहणार आहे.


दीपवीर असं का करतायेत असाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. घर जावई होण्याचं रणवीरचं कारण तुम्हालाही पटेल आणि तुम्ही दीपवीरचा हा निर्ण योग्य असल्याची ग्वाही द्याल.


रणवीर आणि दीपिकाने ५० कोटींचा एक बंगला विकत घेतला आहे. सध्या या बंगल्याचं इंटेरिअरचं काम सुरू आहे. यामुळेच दोघांनी दीपिकाच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे.


जोपर्यंत घराचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत रणवीर आणि दीपिका तिच्याच घरी राहणार आहेत. सध्या दोघंही लग्नानंतर होणाऱ्या रिसेप्शनच्या तयारीत आहेत.


दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन २१ नोव्हेंबरला बँगलुरूमध्ये होणार आहे. यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत मोठ्या पार्टीचं आयोजन केलं आहे. ही पार्टी झाल्यानंतर रणवीर त्याच्या सिंबा सिनेमाच्या प्रमोशनला सुरूवात करणार आहे. पुढे वाचा...


दीपिका-रणवीरच्या लग्नाचे अधिकृत फोटोंची सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने एकमेकांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानं लग्नातील झलक यात दिसून येत आहे.


दीपिका-रणवीरनं 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीत लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटोबाबत त्यांनी खूप गुप्तता पाळली होती. अखेर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.


इटलीणत रंगलेल्या लग्न सोहळ्यात रणवीर सिंग नाचताना दिसत आहे. रणवीरच्या लग्नाचे कपडे शाही पद्धतीचे होते. रणवीरचा शाही लुक या फोटोतून पहायला मिळतं आहे.


नवरीच्या पोषाखात दीपिका पदुकोण फारच छान दिसत आहे. लग्नाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.


लग्नातील दीपिकाचा सर्वात हटके फोटोंपैकी एक असा हा फोटो आहे. मेहंदी कार्यक्रामातील या फोटोमध्ये दीपिका वेगळ्याच स्वॅगमध्ये दिसत आहे.