'मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ' या चित्रपटातील अभिनेत्री आपल्या सर्वानाचं माहिती आहे. अंतरा माळी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. अंतरा फक्त या चित्रपटामुळेच प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. अंतराला 12 वर्षांच्या फिल्मी करीयरमध्ये प्रसिद्धी न मिळाल्याने तिनं बॉलिवूड सोडलं होतं. अंतरा माळीने त्या 12 वर्षात मोजून 11 ते 12 चित्रपटातच काम केलं आहे. मात्र तिच्या एकही चित्रपटाला हव तसं यश मिळू शकलं नाही. मात्र तरीसुद्धा ती कोट्याधीश आहे. कारण अंतराने 'जीक्यू' या मासिकाच्या संपादकाशी लग्न केल आहे.कुरीन असं तिच्या पतीचं नाव आहे. अंतरा सध्या आपल्या मुलीसोबत एन्जॉय करताना दिसून येते. सध्या ती आपला पूर्णवेळ आपल्या कुटुंबाला देत आहे. अंतरा ही प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांची मुलगी आहे.