अनेक सिनेमांमध्ये बोल्ड भूमिका करूनही फ्लॉप ठरली Gangs of Wasseypur ची ही अभिनेत्री
रीमा सेन (Reema Sen) या अभिनेत्रीने 1998 पासून मराठीपासून भोजपूरी, तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा विविध भाषांतील सिनेमात काम केले आहे. मात्र तरी देखील रीमा या क्षेत्रात यश मिळवू शकली नाही आहे


अभिनेत्री रीमा सेन (Reema Sen) आज 39वा वाढदिवस साजरा करत आहे. कोलकातामध्ये 1981 साली तिचा जन्म झाला. 1996 मध्ये तिने बंगाली थिएटरपासून अभिनयाची सुरुवात केली तर 1998 मध्ये भोजपुरी सिनेमातून मोठ्या पडद्यावर डेब्यू केला होता. तिने अनेक चित्रपटात बोल्ड भूमिका केल्या आहे. तर काही फोटोशूटमुळे देखील ती चर्चेत राहिली होती (फोटो सौजन्य- Instagram @reema_sen_official)


रीमा सेनने 1998 ते 2012 या काळात मराठीपासून भोजपुरी, तेलुगू, तमिळ आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. (फोटो सौजन्य- Instagram @reema_sen_official)


2011 मध्ये आलेल्या अनुराग कश्यप दिग्दर्शित गँग्ज ऑफ वासेपूरने रीमाला लोकप्रिय केलं. यामध्ये तिने 'दुर्गा' नावाची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य- Instagram @reema_sen_official)


'गँग्स ऑफ वासेपुर' या सिनेमातून तिला ओळख मिळत होतीच तेवढ्यात ती अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्यास सुरुवात झाली. 2012 मध्ये आलेल्या Sattam Oru Iruttarai या तमिळ सिनेमात ती शेवटची दिसली होती. (फोटो सौजन्य- Instagram @reema_sen_official)


2012 साली रीमा सेनने दिल्लीतील प्रसिद्ध हॉटेलियर शिवकिरण सिंह यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर ती एकाही सिनेमात दिसली नाही. (फोटो सौजन्य- Instagram @reema_sen_official)