कंगना रणौतचा बहुचर्चित चित्रपट 'थलाइवी' आज अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचा प्रकार घडला आहे. तमिळरॉकर्स या सोशल मीडियाग्रुपवर हा चित्रपट ऑनलाइन लीक करण्यात आला आहे. त्यामुळे मेकर्ससोबत कंगनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून सर्वांना या चित्रपटाची प्रतीक्षा होती. हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्यावर आधारित आहे. हिंदीसोबतच तामिळ, तेलगू अशा विविध भाषांमध्ये हा चित्रपट आज रिलीज करण्यात आला आहे.