कबीर खानने एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं, की 'हा चित्रपट बनवण्याचा विचार त्यांच्या मनात यासाठी आलेला की ते अनेकवेळा अफगाणिस्ताला जाऊन आले आहेत. त्यांचे पूर्वज अफगाणिस्तानशी सबंधित आहेत. तसेच त्यांनी बालपणी 'रुट्स'नावाच एक पुस्तक वाचलं होतं. त्यामध्ये एक व्यक्ती आपल्या इतिहासाच्या मुळाचा शोध घेत होता. मलासुद्धा जाणून घ्यायची इच्छा होती की मी कुठून आहे. म्हणून मी अनेकवेळा अफगाणिस्तानमध्ये जाऊन अनेक डॉक्युमेट्री बनवल्या आहेत'.