

आशिकी 2 नंतर स्टार झालेल्या अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस आहे. तिने फक्त 9 वर्षांत बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.


श्रद्धाने बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण तो चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतरही तिला आणखी एका चित्रपटाचं अपयश पदरी आलं.


सुरूवातीचे दोन चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर एका मोठ्या चित्रपटात काम करण्याची तिला संधी मिळाली होती. मात्र, काही कारणांमुळे तिला बाहेर काढण्यात आलं.


अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'तीन पत्ती' मधून श्रद्धाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे श्रद्धा प्रकाशझोतात आली नाही.


श्रद्धाचा पहिला चित्रपट आपटल्याने दिग्दर्शक, निर्माता संजय लिला भन्साळी यांनी 'माय फ्रेंड पिंटो'तून काढून टाकले होते.


करिअरच्या सुरूवातीलाच असा अनुभव आल्यानंतरही तिने बॉलिवूडमध्ये काम करणं सुरूच ठेवलं. यात तिला आशिकी 2 ने स्टार केलं. त्यानंतर मात्र श्रद्धाने मागे वळून पाहिलं नाही.


आशिकी 2 नंतर तिने लागोपाठ हिट चित्रपट दिले. एक व्हिलन, एबीसीडी 2, बागी आणि स्त्री या चित्रपटांनी तिने आपली वेगळी ओळख निरमा केली.


श्रद्धाचे वडील शक्ती कपूर हे पंजाबी तर आई शिवांगी महाराष्ट्राची असल्याने तिला हिंदीसोबत मराठीही बोलता येतं. त्यामुळे भविष्यात एखाद्या मराठी चित्रपटात तिनं काम केल्यास नवल वाटण्यासारखं काही नसेल.