

बिग बॉस 7 ची विजेती राहिलेली अभिनेत्री गौहर खान (Gauher Khan) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गौहर खानबाबत अशी माहिती समोर येत आहे की ती, म्यूझिक कंपोझर इस्माइल दरबार (Ismail Darbar) चा मुलगा आणि प्रसिद्ध टिकटॉकर झैद दरबारला (Zaid Darbar) डेटला करत आहे. (फोटो सौजन्य- instagram/@zaid_darbar)


झैदने सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, मात्र अद्याप अभिनेत्रीने त्या दोघांबाबत कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर केली नाही आहे. (फोटो सौजन्य- instagram/@zaid_darbar)


झैदने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये दोघे डान्स करताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य- instagram/@zaid_darbar)


पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार दोघे एकमेकांबरोबर खूप वेळ एकत्र घालवत आहेत. त्याचप्रमाणे दोघांचे परिवार देखील एकमेकांच्या संपर्कात आहेत.(फोटो सौजन्य- instagram/@zaid_darbar)


दरम्यान झैद आणि गौहर यांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा केली नाही आहे. (फोटो सौजन्य- instagram/@zaid_darbar)


झैद एक प्रसिद्ध टिकटॉकर असून तो एक उत्तम डान्सर देखील आहे. नुकताच तो द छमिया म्युझिक व्हिडीओमध्ये दिसला होता. (फोटो सौजन्य- instagram/@zaid_darbar)


गौहर खान आणि अभिनेता कुशाल टंडन दीर्घकाळासाछी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांचे नाते टिकले नाही