बॉलीवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दक्षिणात्य चित्रपटांतून केली आहे. मात्र त्यांनतर त्यांनी बॉलीवूडकडे आपला मोर्चा वळवला. आणि मोठी प्रसिद्धीसुद्धा मिळविली आहे. आजआपण अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पुन्हा एकदा दक्षिण चित्रपटात पुनरागमन करणार आहेत.
अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या अभिनयाची सुरुवात दक्षिण चित्रपट 'धाम धूम' यातून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता जयम रवी होते. मात्र त्यानंतर तिनं बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. आणि आत्ता 4 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कंगनाने पुन्हा एकदा 'थलाइवी' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटात प्रवेश केला आहे.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने सुद्धा आपल्या कारकिर्दीची सुरुवात दक्षिणात्य चित्रपटातून केली आहे. त्यानंतर तिनं बॉलीवूड मध्ये काम केलं. आणि 3 वर्षांपूर्वी तिनं 'स्पायडर' या महेशबाबू च्या चित्रपटातून दक्षिण मध्ये पुनरागमन केलं होतं. सध्या ती कमल हसन यांचा चित्रपट 'इंडियन 2 ' या तमिळ चित्रपटात व्यस्त आहे. त्याचबरोबर ती 'अयालन' या तमिळ चित्रपटात सुद्धा झळकणार आहे.
अभिनेत्री पूजा हेगडेने आपल्या अभिनयाची सुरुवात 'mugamoodi; या तमिळ चित्रपटाद्वारे केली होती. त्यानंतर ती तेलुगु चित्रपटात व्यस्त झाली आणि नंतर तिनं बॉलीवूडकडे आपला मोर्चा वळवला. आता पुन्हा एकदा पूजा दक्षिण चित्रपटात सक्रीय झाली आहे. सध्या ती रामचरण आणि चिरंजीवी सोबत 'आचार्य' या चित्रपटात काम करत आहे. तसेच तिला विजयच्या 'थालापती 65' या चित्रपटासाठी सुद्धा घेण्यात आलं आहे.