या प्रसिद्ध बहीण-भावंडांची लवकरच होणार बॉलीवूडमध्ये एंट्री, पाहा PHOTO
या वर्षात बॉलीवूडमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांचा प्रवेश होणार आहे. यात अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या बहीण-भावांचा समवेश आहे. पुन्हा नेपोटिझमची चर्चा रंगणार तर...
गेलीवर्षभर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्याचा फटका बॉलीवूडला सुद्धा बसलेला आहे. त्यामुळे कित्येक दिवसांपासून मोठ-मोठे चित्रपट प्रदर्शित व्हायचे थांबले आहेत.
2/ 7
2017 मध्ये मिस वर्ल्ड हा किताब पटकावणारी मानुषी छील्लर लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे चाहते मोठ्या आतुरतेने मानुषीला बघण्याची प्रतीक्षा करत आहेत. ती अक्षय कुमारसोबत 'पृथ्वीराज' या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये ती राजकुमारी 'संयोगिता' ची भूमिका साकारणार आहे.
3/ 7
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीनं आपल्या मुलीला बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज केलं आहे. पलक तिवारी असं तिचं नाव आहे. पलक लवकरच अभिनेता विवेक ओबेरॉय सोबत अभिनय करताना दिसून येणार आहे. 'द सैफरन चाप्टर' असं त्या चित्रपटाचं नाव आहे.
4/ 7
बॉलीवूडची यशस्वी अभिनेत्री म्हणून समजली जाणारी कटरिना कैफची बहीण इसाबेल कैफचंसुद्धा बॉलीवूड पदार्पण झालं आहे. इसाबेल ही सूरज पांचोली सोबत 'टाईम टू डान्स' मध्ये झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
5/ 7
सुनील शेट्टीचा मुलगा आणि अभिनेत्री अथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टीसुद्धा लवकरच बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. अहान हा 'तडप' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तरल सुतारिया सुद्धा असणार आहे. नुकताच या चित्रपटाचं पोस्टरसुद्धा प्रदर्शित झालं आहे.
6/ 7
YouTube स्टार कॅरी मिनाटी म्हणजेच अजय नागरसुद्धा लवकरच बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. तो 'मेडे' या चित्रपटात दिसून येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग सारखी तगडी कलाकारमंडळी सुद्धा असणार आहेत.
7/ 7
नुकताच करण जौहरनं शनाया कपूरच्या पदार्पणाची घोषणा आपल्या सोशल मिडियावर केली आहे. शनाया ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे. लवकरच तिच्या चित्रपटाची देखील घोषणा होणार आहे.