टायगर श्रॉफच्या बहिणीचा ब्रेकअप, बॉयफ्रेंडबरोबरच्या किंसिग PHOTOS मुळे आली होती चर्चेत
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कृष्णाचे तिचा बॉयफ्रेंड Eban Hyams बरोबरचे काही रोमँटिक फोटो देखील व्हायरल झाले होते.


बॉलिवूडचे (Bollywood) दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अभिनेता टायगर श्रॉफ ( (Tiger Shroff) या दोघांचाही एक चाहतावर्ग आहे. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) ही बॉलिवूडपासून दूर आहे. असे असले तरीही तिची सोशल मीडियावर खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे.


कृष्णा तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्याबाबतही तिने कोणता आडपडदा न ठेवता सोशल मीडयावर भाष्य केले आहे. ती बास्केटबॉल प्लेअर Eban Hyams याला गेल्या काही वर्षांपासून डेट करत होती.


मात्र आता कृष्णा आणि एबन यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप त्यांच्या ब्रेकअपचं कारण समजलं नाही आहे. कृष्णाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एबन बरोबरचे सर्व फोटो हटवले आहेत.


दरम्यान एबनने पोस्ट केलेली एक स्टोरी देखील चर्चेत आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने कृष्णा बरोबरच्या ब्रेकअपचे संकेत दिले आहेत.


एबनने अशी पोस्ट केली आहे की 'अंतर असल्यामुळे नात्यांवर त्यांचा परिणाम नाही व्हायला पाहिजे, प्रेम नेहमी पर्वा न करता केले पाहिजे.' त्याने या पोस्टमध्ये कृष्णाचं नाव मेन्शन केलं नाही आहे. मात्र दोघांमधील अंतर त्यांच्या ब्रेकअपचं कारण असल्याचं बोललं जात आहे


कृष्णा आणि एबन या दोघांनी एकमेकांना अनफॉलो देखील केलं आहे. कृष्णाने ब्रेकअप बाबत पोस्ट शेअर केली होती. तिने असे म्हटले होते की, 'तुम्ही सर्व फॅन क्लब खूप क्यूट आहात. पण आता फोटोंमध्ये मला आणि एबनला टॅग करू नका. आता आम्ही एकत्र नाही आहोत. त्यामुळे आमचं नाव एकमेकांशी जोडू नका.'