Year Ender 2022: सोहेल खान ते ऐश्वर्या धनुष; 2022 मध्ये 'या' कलाकारांनी संपवलं त्यांचं नातं
2022 हे वर्ष अनेकांसाठी त्रासदायक ठरलं तर काहींसाठी अत्यंत उत्साहाचं. काही नवी नाती निर्माण झाली तर काहींनी त्यांच्या नात्याला पूर्ण विराम दिला. 2022मध्ये झालेल्या सेलिब्रेटी घटस्फोटांची माहिती जाणून घ्या.
अनेक बॉलिवूड कलाकारांनी यंदा लग्न केली तर काहींनी आपल्या नात्याला फुलस्टाप लावला. कोण आहेत ते कलाकार पाहा.
2/ 8
अभिनेता राजीव सेन आणि चारू असोपा यांची लग्नानंतर खूप चर्चेतआलं. त्यांच्या लग्नाला दुसरा चान्स देण्यासाठी ते एकत्र आले पण त्यांच्यांत अनेक आरोप प्रत्यारोप रंगले.
3/ 8
सिंगर हनी सिंहवर मागच्या वर्षी बायको शालिनीनं गंभीर आरोप लावले होते. दोघांनी यावर्षी घटस्फोट घेतला असून हनी सिंहनं बायकोला 1 करोड रुपयांची पोटगी दिल्याचं म्हटलं जात आहे.
4/ 8
साऊथ सुपरस्टार रजनिकांतची लेक ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष यांनीही 2022मध्ये दोघांचं नातं संपवलं. जानेवारीमध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
5/ 8
महाभारत फेम मराठमोळा अभिनेता नितीश भारद्वाज यांनीही पत्नी स्मिता गेटपासून घटस्फोट घेतला. IES अधिकारी असलेल्या स्मिता गेट यांच्याबरोबर नितीश यांनी 12वर्षांचा संसार केला.
6/ 8
अभिनेता सोहेल खान आणि सीमा यांचं लव्ह मॅरेजही तब्बल 24 वर्षांनी संपुष्टात आलं. 2022मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.
7/ 8
तसंच अभिनेता इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला.
8/ 8
टेलिव्हिजन अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल यांचा घटस्फोटही अनेक दिवस चर्चेचा विषय ठरला. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत नात्याला पूर्णविराम दिला