बॉलिवूड सेलिब्रिटींनी घेतली कोरोना लस; तुमचा फेव्हरेट स्टार यात आहे का पाहा PHOTO
सेलिब्रिटीसुद्धा आपलं कोरोना लसीकरण करत चाहत्यांना लस घेण्यासाठी प्रेरित करत आहेत.
|
1/ 10
कोरोनाचा वाढता प्रभाव बघून अनेक कलाकार कोरोना लस टोचून घेत आहेत. बॉलिवूडचा दबंग सलमान खाननेसुद्धा बुधवारी कोरोना लस घेतली आहे. सलमानने स्वतः ट्वीट करत, चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
2/ 10
अभिनेता संजय दत्तनंसुद्धा कोरोना लस घेतली आहे. त्याचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
3/ 10
नुकताच पुन्हा वडील बनलेला अभिनेता सैफ अली खाननं सुद्धा दक्षता घेत कोरोना लस घेतली आहे.
4/ 10
मराठमोळी अभिनेत्री आणि दक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबू याची पत्नी शिल्पा शिरोडकर ही सर्वात आधी कोरोना लस घेणारी सेलिब्रिटी होती
5/ 10
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि हृतिक रोशन यांचे वडील राकेश रोशन यांनीसुद्धा कोरोना लस टोचून घेतली आहे.
6/ 10
बॉलिवूडचे जम्पिंग जॅक जितेंद्र यांनी आपली पत्नी शोभा कपूर यांच्यासोबत कोरोना लस घेतली आहे.
7/ 10
बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर यानंसुद्धा कोरोना लस टोचून घेतली आहे.
8/ 10
बॉलिवूड तसंच दक्षिणात्य अभिनेता नागार्जुननेसुद्धा कोरोना लस टोचून घेतली आहे.
9/ 10
ज्येष्ठ हिंदी आणि तामिळ अभिनेता कमल हसन यांनीसुद्धा नुकताच कोरोना लस घेतली.
10/ 10
ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनीदेखील आपलं लसीकरण करून घेतलं.