जयपूर, 02 जानेवारी: शुक्रवारी संध्याकाळी बॉलीवूड सेलिब्रिटींनी पुन्हा एकदा रणथंभोर नॅशनल पार्कला भेट दिली. त्यांना वाघांचं दर्शन घ्यायचं होतं, परंतु वाघ न दिसल्यामुळे त्यांच्या निराशा झाली. त्यांनी वाघाला पाहण्यासाठी संपूर्ण पार्क पालथं घातलं पण त्यांना वाघ काही दिसला नाही. दरम्यान या कलाकारांना पाहाण्यासाठी चाहत्यांनी पार्कबाहेर गर्दी केली होती.