

बॉलिवूडच्या स्टार्सना आपल्या व्यग्र वेळापत्रकातून स्वतःसाठी वेळ कसा काढायचा हे चांगलंच माहीत असतं. छोट्या- छोट्या गोष्टीत ते आनंद घेत असतात. असंच काहीसं राजकुमार रावनेही केलं.


एक लडकी को देखा तो ऐसा लगा सिनेमाची टीम सुपर डान्सर ३ या कार्यक्रमात सिनेमाचं प्रमोशन करायला गेली होती. यावेळी राजकुमारने कार्यक्रमाचे जज आणि दिग्दर्शक अनुरा बासू यांना एक किस्सा सांगितला.


एका सिनेमाच्या चित्रीकरणावेळी राजकुमार राव भोपाळमध्ये होता. तेव्हा त्याने एका अनोळखी लग्नाच्या वरातीत तो नाचला होता. अनुराग यांनीही तो किस्सा अजून फुलवून सांगितला तेव्हा तिथे उपस्थित सारेच हसायला लागले.


राजकुमार त्या लग्नात नाचायला गेल्यामुळे सिनेमाचं चित्रीकरण काही वेळासाठी थांबवलं गेलं होतं. यावेळी फक्त एकटा राजकुमारचं नाही तर सिनेमातील इतर काही सदस्यही त्याच्यासोबत लग्नाच्या वरातीत नाचून आले होते.