नुकतंच फेमिना ब्युटीफुल इंडियन्स 2022 चं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये बॉलिवूडमधील सर्व अभिनेत्रींनी सहभाग घेतला होता. यावेळी अभिनेत्री तापसी पन्नूसुद्धा ग्लॅमरस अंदाजात दिसून आली. तापसी पन्नूने तिच्या इन्स्टाग्रामवर इव्हेंटचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने साडीच्या वर स्टायलिश कोट परिधान केला आहे. अभिनेत्रीने या ग्लॅमरस ड्रेस सोबतच हलकासा मेकअप करत आपला लुक कंप्लिट केला आहे. अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. साडी आणि कोट हे कॉम्बिनेशन अनेकांना पसंत पडल्याचं दिसत आहे. चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. नुकतंच 1 एप्रिलला तापसीचा तेलुगू चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल' रिलीज झाला आहे.